सातारा -कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कराड शहर पोलिसांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसलेल्या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत त्यांनी ४१ हजार रूपयांचा दंड वसूल केला. वाईन शॉपसह अन्य दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या उल्लंघन प्रकरणी कराडमध्ये ४१ हजाराचा दंड वसूल
सध्या कराड शहरातील सराफ आणि कापड दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतू, किरणा असोसिएशनचे दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यामुळे शहरातील गर्दी कायम आहे. कराड शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. अशा परिस्थितीत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानुसार पोलिसांनी गर्दी होणार्या ठिकाणी जाऊन खात्री करून संबंधितांवर कारवाई केली.

शनिवारी दिवसभरात पोलिसांनी ८३ ठिकाणी कारवाई करत ४१ हजार रूपयांचा दंड वसूल केला. याशिवाय कराडच्या महसूल विभागानेही स्वतंत्रपणे कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जरब बसणार आहे.