सांगली - दिवाळीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डर्टी इलेव्हन नेत्यांचे घोटाळे पुराव्यानिशी उघडकीस आणू, असा दावा भाजप नते किरीट सोमैया यांनी केला. ते सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आता तुम्ही आता बॅग भरा, असा इशारा दिला.
भाजप नेते किरीट सोमैया पत्रकार परिषदेत बोलताना 750 कोटी संपत्ती खरामाटे की परब ?
परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील वंजारवाडी गावासह खरमाटे यांच्या मालमत्ता असणाऱ्या ठिकाणांना भेट दिली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदे मधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.
बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे 40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे. ती कुठून आली? याची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की, अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे हे लवकरच समोर येईल. मात्र, ठाकरे सरकारचा एक अनिल तुरुंगाचा दरवाजावर आहे. तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे, या शब्दात सोमैया यांनी टीका केली.
हेही वाचा -कोविडमुळे निवडणुका घेता आल्या नाही, प्रशासकांची नेमणूक जाणीवपूर्वक नाही - नवाब मलिक
ठाकरेंची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तुरुंगात -
शिवसेनेवर निशाणा साधताना किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे, असा आरोप केला. उद्धव ठाकरेदेखील एक घोटाळेबाज आहेत. सरकारची लूट ठाकरे सरकार करत आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अनेक संपत्ती आहे. हे बेनामी सरकार ठाकरे सरकार असून या उद्धव ठाकरेंच्या डर्टी इलेव्हनचे भ्रष्टाचाराचे घोटाळे आपण पुराव्यानिशी उघडकीस आणणार आहोत, असा दावा त्यांनी केला. तसेच डर्टी इलेव्हननंतर उध्दव ठाकरे हे बारावे खेळाडू आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर ठाकरेंची इलेव्हन तुरुंगात जाईल, असा इशारा किरीट सोमैयांनी दिला. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे, पुढच्या आठवड्यात शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांच्यावरही कारवाई होणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्हीदेखील आता बॅग भरायला लागा, अशा शब्दांत किरीट सोमैया यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनादेखील इशारा दिला