महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वारणा सहकारी साखर कारखान्याने थकीत ऊस बिले द्यावी, अन्यथा 16 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

वारणा सहकारी साखर कारखान्याने थकीत ऊस बिले 15 जुलैपर्यंत द्यावीत अन्यथा 16 जुलैपासून कारखान्याच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला.

बेमुदत ठिय्या आंदोलन
बेमुदत ठिय्या आंदोलन

By

Published : Jul 4, 2021, 3:34 PM IST

सांगली - वारणा सहकारी साखर कारखान्याने थकीत ऊस बिले 15 जुलैपर्यंत द्यावीत अन्यथा 16 जुलैपासून कारखान्याच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवार 3 जुलै रोजी वारणा सहकारी कारखान्याचे व्यवस्थापक एस. पी. भगत यांना देण्यात आले.

वारणा सहकारी साखर कारखान्याने थकीत ऊस बिले द्यावी, अन्यथा 16 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

'..अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन'

निवेदनात म्हटले आहे की, वारणा कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची 15 जानेवारी पर्यंतची बिले दिलेली आहेत. त्यानंतर गाळप झालेल्या ऊसाचा एक रुपयाही दिलेला नाही. यापूर्वी वर-वर बिले मागितली, मात्र केवळ तारखाच देण्यात आल्या, यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत, पैसे नसल्याने उपचार करता आले नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या पैशाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या मुलामुलीची लग्ने थांबली आहेत. एवढ्या प्रचंड अडचणी असताना हक्काचे पैसे मिळत नाहीत. ही शोकांतिका आहे. त्यामुळेच शनिवारी वारणा कारखाण्यावर धडक देण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कारखाना परिसर दणाणून सोडला. कारखाना प्रशासनाशी चर्चा करण्यात आली 15 जुलैपर्यंत बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावीत, अन्यथा 16 जुलैपासून काखण्याच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

'१२ जुलैपर्यंत बीले जमा करण्याचे अश्वासन'

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, शेतकरी नेते भागवत जाधव, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, वैभव कांबळे प्रकाश देसाई ,प्रभाकर पाटील राजू परीट, उदय गायकवाड, नामदेव सावंत, सुरेश पचिब्रे, अण्णा मगदूम आदींसह अन्य उपस्थित होते. तर वारणा कारखान्याचे व्यवस्थापक एस.पी. भगत यांनी १२ जुलैपर्यंत शेतकऱ्यांची बीले जमा करण्याचे अश्वासन दिले. तर बिले जमा करा अन्यथा १६ जुलैपासून वारणा कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती भागवत जाधव यांनी दिली.

हेही वाचा -विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय?

ABOUT THE AUTHOR

...view details