सांगली - जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 2435 मतदान केंद्रावर 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात पाऊसाची शक्यता असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.मात्र, मतदान केंद्रावर मतदार उत्साहात हजेरी लावत आहे.
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात - Maharashtra Assembly Elections 2019
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 2435 मतदान केंद्रावर 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलानेही (रोहित पाटील) पहिल्यांदा मतदानाचा केले. रोहितने तासगावच्या अंजनीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केले. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले असून जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.