सांगली - जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. मुंबईहून आलेल्या एका ट्रक चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी या आपल्या गावी निघाला असता आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाने संशयित असल्याने ताब्यात घेऊन टेस्ट केली असता, या चालकाचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. वेळीच ही बाब समोर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता आठवर पोहचली आहे.
मुंबईहून आलेला ट्रक चालक 'कोरोना पॉझिटिव्ह', वेळीच तपासणी झाल्याने टळला अनर्थ
आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे संबंधित ट्रक चालक विनातपासणी आपल्या गावी पोहोचू शकला नाही. त्याला त्वरित उपचार मिळाल्याने तो लवकर बरा होण्याचीही शक्यता आहे. तसेच, तो आणखी लोकांच्या संपर्कात न आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या ट्रक चालकाला कोरोना लागण झाल्यामुळे सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे.
दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यातल्या चोरोची याठिकाणी आरोग्य विभागाच्या तपासणीदरम्यान संबंधित ट्रक चालकामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर तातडीने त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेऊन मिरजेच्या आयसोलेशन कक्षामध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्याची स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी रात्री मिळाला असून हा ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.