सांगली - नेपाळला फिरायला गेलेले 28 प्रवाशी सांगली जिल्ह्यात परतले आहेत. यामध्ये मिरजमधील 9 तर कोल्हापूरमधील 19 जणांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांना सांगली प्रशासनाकडून होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एका प्रवाशाला मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेपाळहून परतलेल्या मिरजच्या 9 तर कोल्हापूरच्या 19 जणांना होम क्वारंटाईनाच्या सूचना... हेही वाचा...#CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा
मिरज आणि कोल्हापूरमधील नेपाळला फिरायला गेलेले 28 प्रवासी हे राज्यात परतलेले आहेत. दि. 17 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर आणि मिरजमधील 28 नागरिक खासगी ट्रॅव्हलसमधून नेपाळला फिरायला गेले होते. यात 9 प्रवासी मिरज येथील तर कोल्हापूर येथील 19 प्रवासी होते. हे सर्व जण आज (सोमवार) सकाळी खासगी ट्रॅव्हलसमधून सांगली जिल्ह्यात दाखल झाले.
कवठेमहांकाळच्या नागज येथे जिल्ह्याच्या सीमेवर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व प्रवाशांच्या हातावर क्वारांटाईनचे शिक्के मारण्यात आले. त्यानंतर ही खासगी बस सकाळी मिरजेत दाखल झाली. त्यावेळी मिरजेतील पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनेकडून ही गाडी थांबवत मिरजमधील प्रवाशांबाबत चौकशी केली. यापैकी एका प्रवाशाची तब्येत बिघडल्याने त्याला मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.