महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोपीचंद पडळकर यांसह तानाजी पाटील यांना कोणत्याही क्षणी होणार अटक!

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके(sangli district bank election)च्या निवडणुकीच्या निमित्ताने आटपाडी याठिकाणी काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) विरुद्ध महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)च्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shiv sena & NCP) असा राडा झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली. तरी या प्रकरणी आटपाडी पोलीस (Atpadi Police) ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या दहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर

By

Published : Nov 18, 2021, 10:06 PM IST

सांगली -आटपाडी येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकी(sangli district bank election)च्या निमित्ताने झालेल्या राडाप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar)आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील (Tanaji Patil) यांचा अटकपूर्व जामीन सांगली जिल्हा न्यायालया(sangli district court)ने फेटाळला आहे. त्यामुळे आता आमदार पडळकर यांच्यासह तानाजी पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार पडळकर विरुद्ध महाविकास आघाडी राडा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आटपाडी याठिकाणी काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) विरुद्ध महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)च्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shiv sena & NCP) असा राडा झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली. तरी या प्रकरणी आटपाडी पोलीस (Atpadi Police) ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या दहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह शिवसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचाही समावेश आहे.

पडळकरांचा जमीन अर्ज फेटाळला

गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि तानाजी पाटील या दोघांनी सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने पडळकर आणि तानाजी पाटील या दोघांचाही अर्ज फेटाळून लावला आहे. तर या राडा प्रकरणाचा तपास सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे काही दिवसांपूर्वीच सोपवण्यात आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पडळकर व तानाजी पाटील या दोन्ही नेत्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आल्या आहेत. आता दोघांचाही जामीन अर्ज फेटाळल्याने आमदार गोपीचंद पडळकर व माजी जिल्हा परिषद नेते तानाजी पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंदोलनातून अटक होणार का?

सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गोपीचंद पडळकर हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता सांगली पोलीस आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करण्यासाठी मुंबई या ठिकाणी धाव घेणार का आणि त्यांना अटक करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details