महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस सिलिंडर ठेवून केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी

गॅस सिलिंडर ठेवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत इंधन दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.

Shiv Sena
Shiv Sena

By

Published : Feb 3, 2021, 4:02 PM IST

Updated : Feb 3, 2021, 4:16 PM IST

सांगली - इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. गॅस सिलिंडर ठेवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत इंधन दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.

निदर्शने करत केंद्राचा निषेध

केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात आले आहे. तसेच गॅस सबशिडी ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत शिवसेनेच्यावतीने सांगलीमध्ये आज केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आला आहे. केंद्राने केलेल्या दरवाढीचा निषेध म्हणून स्टेशन चौकच्या बाळासाहेब ठाकरे चौक याठिकाणी गॅस सिलेंडर ठेऊन सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने तातडीने ही दरवाढ रद्द करावी गॅस सबसिडी पूर्वीप्रमाणे द्यावी, अशी मागणी करत या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 4:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details