सांगली - जिल्हा कारागृहातील एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक आवळे असे या कैद्याचे नाव असुन चोरीच्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून शिक्षा भोगत होता. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.
सांगलीत कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
सांगली येथील जिल्हा कारागृहातील एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक आवळे असे या कैद्याचे नाव असुन चोरीच्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून शिक्षा भोगत होता. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. दीपक याने आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
सांगली जिल्हा कारागृहात गेल्या सहा महिन्यांपासून चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या दीपक आवळे (20) इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली येथे राहणारा होता. या कैद्याने कारागृहात पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार समोर आल्यावर कारागृहात एकच खळबळ उडाली.
दीपक आवळे याच्या विरोधात सांगली शहर आणि तासगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते. याप्रकरणी तो जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता, मात्र दीपक याने आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.