सातारा - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज दुपारी चार वाजता 12 फुटांनी उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून 53 हजार 360 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 85.59 टीएमसी झाला असून धरणात 2 लाख 98 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
कोयनेचे सहा दरवाजे 12 फुटांवर, सांगलीला पुराचा धोका वाढला
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज दुपारी चार वाजता 12 फुटांनी उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून 53 हजार 360 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 85.59 टीएमसी झाला असून धरणात 2 लाख 98 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर प्रचंड आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज दुपारी चार वाजता 12 फुटांनी उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून 53 हजार 360 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 85.59 टीएमसी झाला असून धरणात 2 लाख 98 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार आणि धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे कोयना-कृष्णा नदीकाठावर महापूराचा धोका वाढला आहे. दोन्ही नद्यांच्या उपनद्या देखील धोका पातळी बाहेर गेल्या आहेत. 2019 पेक्षा ही भयानक संकट कृष्णा आणि कोयना नदीकाठी निर्माण झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सांगलीस शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.