सांगली - ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हे अलर्ट झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये कोरोना प्रतिबंधक ‘वॉर रूम’ सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'कोरोना'ची धास्ती! येरावडा कारागृहातील कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून मास्कसह सॅनिटायझर
कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या वॉर रुममध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांच्या निगराणीखाली २४ तास माहिती आणि मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभाग आणि इतर विभागाचे काही अधिकारी-कर्मचारी कोरोनाच्या बाबतीत मदत जनजागृती आणि माहिती जमा करण्यासाठी कार्यरत आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासन अलर्ट हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल
कोरोनाबाधित देशातून जिल्ह्यात ७३ प्रवासी परतले आहेत, तर पुण्यात कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या सांगलीत वॉर रूमच्या माध्यमातून जिल्ह्यात परदेशातून दाखल होणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत माहिती संकलित करणे. त्यांच्याबरोबर जे प्रवासी आधीच दाखल झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत दररोज काळजी घेणे, सल्ला देणे, असे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात मिरज येथे ४८ बेडचा क्वारंन्टाईन कक्ष तयार करण्यात आला आहे. याबरोबरच रुग्णांसाठी ६ ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
हेही वाचा - ..तर सोसायटी धारकांना कोरोना झाल्यास कोण जबाबदार?
सध्याच्या घडीला जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही, तर परदेशी प्रवास करून आलेले ७३ लोक आहेत. यामधील ६ लोक आयसोलेशनमध्ये होते. त्यांची चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज केले आहे. उर्वरित लोकांना घरी विलगीकरण (क्वारंन्टाईन) केले आहे. त्यातील १४ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. जिल्ह्यात ३५ आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले असून आवश्यकतेनुसार ते वाढवले जातील. क्वारंन्टाईनची १५० पर्यंत सुविधा तयार ठेवली असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती आशा पाटील यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.