सांगली -राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे दारुडे सरकार, अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर विरोधक अर्थसंकल्प अधिवेशनात धारेवर धरतील. या भीतीने पळ काढण्यासाठी आता कोरोनाचा बाऊ केला जात आहे. हे सरकार आंधळे, मुके आणि बहिरे सरकार असल्याची टीकाही आमदार खोत यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिवजयंतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. एका बाजूला हे सरकार यात्रा काढत आहे. दुसऱ्या बाजूला मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम होत आहेत. परंतु जनतेचा आवाज गेल्या 2 वर्षांपासून सरकार दाबण्याचे काम करत आहे. जेणेकरून जनता रस्त्यावर येऊ नये, म्हणून काही वेळा हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपते. काही वेळा कोरोनाच्या आडाला दडून बसते. आता तर अधिवेशन तोंडावर आले आहे. आता या सरकारला या अधिवेशनातून पळ काढायचा आहे. म्हणून आता सगळीकडे कोरोना वाढल्याचे सरकार बोंब मारत आहे.
सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का ? सहा महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत, याचा अर्थ असल्याची टीका आमदार खोत यांनी केली.
हेही वाचा-निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात - शिवसेना आमदार वैभव नाईक