महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयर्विन पुलाच्या कामासाठी ठेकेदाराकडून वीज चोरीचा प्रकार

सांगलीतील आयर्विन पुलाच्या कामासाठी ठेकेदाराकडून वीज चोरीचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिक व नगरसेवकांना हा चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत ठेकेदारावर कारवाई आणि पुलाचा काही भाग नागरिकांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी पुलावर ठिय्या मारण्यात आला.

By

Published : Feb 26, 2021, 2:59 PM IST

Irwin bridge work sangli
सांगली

सांगली- आयर्विन पुलाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून वीज चोरीचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिक व नगरसेवकांना हा चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत ठेकेदारावर कारवाई आणि पुलाचा काही भाग नागरिकांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी पुलावर ठिय्या मारण्यात आला.

सांगली
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगली शहरातील आयर्विन पुलाची डागडुजी करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या कामाचा ठेका देण्यात आला आहे. तर याठिकाणी काम सुरू झाल्याने पुलावरून जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. पुलाच्या पलीकडे असणाऱ्या सांगलीवाडी येथील नागरिकांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुलाच्या ठेकेदाराने पुलावरून काही भाग हा दुचाकी आणि पादचाऱ्यांच्यासाठी मोकळा ठेवावा, या मागणीसाठी गेले असता या पुलाच्या कामासाठी विज चोरून घेण्यात आल्याचा प्रकार नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला नगरसेवक पाटील यांनी जाब विचारत नागरिकांसह आयर्विन पुलावर ठिय्या मारत विज चोरी प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. पुलाचा काही भाग सांगलीवाडीकर नागरिकांच्यासाठी खुला करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details