सांगली - एका विवाहित महिलेनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात विवाहित महिलेचा मृत्यू संशयास्पद असून सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे मृत महिलेचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप
दिपश्री ही मूळची विजापूर जिल्ह्यातील बेल्लोळी येथील आहे. सांगली जिल्ह्यातील वळसंग येथे मामाकडे वाढली. चार वर्षापूर्वी सांगलीतील सागर ओलेकर याच्याशी दिपश्री हिचे लग्न झाले होते. या दोघांना दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र, दिपश्री हिने आत्महत्या का केली किंवा तिचा घातपात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत काहीही समजू शकले नाही.
सांगलीच्या वाराणाली येथे राहणाऱ्या दिपश्री सागर ओलेकर (वय-२२) या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर दिपश्री हिच्या नातेवाईकांनी ही घरी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांना दिपश्री हिचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत आढळला. सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप करत आक्षेप नोंदवला. यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय परिसरात ठिय्या मारला होता.
दिपश्री ही मूळची विजापूर जिल्ह्यातील बेल्लोळी येथील आहे. सांगली जिल्ह्यातील वळसंग येथे मामाकडे वाढली. चार वर्षापूर्वी सांगलीतील सागर ओलेकर याच्याशी दिपश्री हिचे लग्न झाले होते. या दोघांना दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र, दिपश्री हिने आत्महत्या का केली किंवा तिचा घातपात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत काहीही समजू शकले नाही. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व बाब समोर येणार आहे. संजयनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.