सांगली- सांगलीत आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी शानदार पोलीस संचलन पार पडले.
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री देशमुखांच्या हस्ते ध्वजारोहण
राज्याचे सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
१ मे कामगार दिन अर्थात महाराष्ट्र दिन सांगलीमध्ये प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने सांगली पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले राज्याचे सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस दल तसेच स्काऊट गाईड पथकाच्यावतीने शानदार संचलन करत मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा देताना, महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचे योगदान आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो असे मत व्यक्त केले.