महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णा नदी 'प्रदुषण मुक्त' अभियानाला सुरुवात

अखेर सांगली महापालिकेने जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

By

Published : Feb 8, 2019, 7:58 PM IST

sangali

सांगली - अखेर सांगली महापालिकेने जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा संकल्प करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला आहे. कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ'संथ वाहते कृष्णामाई' अशी ओळख असणाऱ्या कृष्णा नदीची अवस्था गेल्या काही वर्षात फार भयानक बनली आहे. 'स्वच्छ व निर्मळ' समजल्या जाणाऱ्या कृष्णा नदी पात्रात मिसळणारे मैल मिश्रित पाणी, कारखान्यांचे दुषित पाणी आणि विविध कारणांनी कृष्णा नदीला अक्षरशः गटार गंगेचे रूप प्राप्त झाले आहे. शेरी नाल्यामुळे कृष्णेचे पात्र नेहमीच प्रदुषित राहिले आहे.

कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ
अनेक सामाजिक संघटनांनी याविरोधात अनेकवेळा आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णेच्या प्रदुषणाची गंभीर दखल घेत सर्व संबंधितांना विशेषतः पालिका प्रशासनाला कडक कारवाईचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाने अखेर कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीचा निर्धार केला. सांगली महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कृष्णेच्या स्वच्छतेचा शुभारंभ केला आहे. या स्वच्छता मोहिमेत महापौर संगीता खोत यांच्यासह महिला नगरसेवकांनी नदी पात्रात उतरून कचरा गोळा केला. या मोहिमेत महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांनीही सहभाग घेत कृष्णा प्रदूषणमुक्त अभियानाची सुरुवात केली आहे. या मोहिमेत अर्धा टन कचरा आणि निर्माल्य यावेळी कृष्णा नदीच्या पात्रातून काढण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने येणाऱ्या बजेटमध्ये कृष्णा प्रदूषण मुक्त अभियानासाठी भरीव निधी धरला असून पुढील अडीच वर्षात सर्व नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details