महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णेच्या पातळीत वाढ, एका रात्रीत १० फुटाने वाढली पाणी पातळी..

गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणी पातळी दहा फुटाने वाढली आहे. सांगलीमध्ये २२ फूट इतकी पाण्याची पातळी झाली आहे.

एका रात्रीत १० फुटाने वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी...

By

Published : Jul 28, 2019, 1:59 PM IST

सांगली- राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणी पातळी १० फुटाने वाढली आहे. सांगलीमध्ये पाण्याची पातळी २२ फूटांपर्यंत गेली आहे. त्यामुळे सांगली नजीकच्या कसबे डिग्रज आणि आयुर्विन पुलाजवळचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

एका रात्रीत १० फुटाने वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी...

कोयना आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून, कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदी सध्या पात्राबाहेर पडली आहे. शनिवारी संध्याकाळ पर्यंत १२ फुटांवर असणारी पाण्याची पातळी १० फुटांनी वाढली आहे. त्यामुळे २२ फूट इतकी पाण्याची पातळी सध्या आयर्विन पूल या ठिकाणी झाली आहे. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे कसबे डिग्रज नजीकचा एक बंधारा आणि सांगली नजीकच्या आयुर्विन पूलाजवळचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, या पार्श्‍वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details