महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लखलख दिव्यांनी उजळून गेला कृष्णेचा घाट

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सांगलीकरांनी शहरातील कृष्णा घाटावर एकत्र येऊन दिवे लावून तसेच कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली.

By

Published : Nov 29, 2020, 9:21 PM IST

krishna-ghat-was-illuminated-by-lights-on-occasion-of-tripura-pornima-in-sangli
सांगली : त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त लखलख दिव्यांनी उजळून गेला कृष्णेचा घाट

सांगली - हजारो दिव्यांनी सांगलीतील कृष्णा नदीघाट पात्र आणि परिसरआज उजळून निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सांगलीकरांनी शहरातील कृष्णा घाटावर एकत्र येऊन दिवे लावून तसेच कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. त्यामुळे कृष्णा नदीघाट पात्र व परिसर दिव्यांच्या रोषणाईने लखलखून गेला होता.

त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त लखलख दिव्यांनी उजळून गेलेला कृष्णेचा घाट
दिवे लावून श्रीकृष्णाचा विजयोत्सव -
भगवान श्रीकृष्णाने केलेल्या त्रिपुरासुराच्या वधाचा आनंदोत्सव म्हणून त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. सांगलीतही आज मोठ्या उत्साहात ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सांगलीच्या नदी घाटावर यानिमित्ताने हजारो सांगलीकरांनी एकत्र येऊन दिवे प्रज्वलित केले. शहरातल्या सरकारी घाटावर यावेळी हा सोहळा पार पडला. यामुळे संपूर्ण घाट हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. मोठ्या उत्साहात महिलांनी यावेळी कृष्णाकाठी या त्रिपुरारी पौर्णिमाच्या निमित्ताने गर्दी केली होती. यावेळी महिलांनी दिवे प्रज्वलीत करून कृष्णेच्या पात्रातही सोडले. त्यामुळे कृष्णेचे पात्र लखलखून गेले होते. तर हा दिव्यांचा उत्सव पाहण्यासाठी सांगलीकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details