महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohan Naik murder : सांगलीत तरुणाच्या खून प्रकरणी चौघे ताब्यात, दोघांना अटक

सांगली शहरात किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या ( Rohan Naik murder two arrest ) खून प्रकरणी चौघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बारमध्ये दारू पीत असताना दोन गटात झालेल्या वादातून रोहन नाईक, या 21 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली होती. मुख्य संशयित परीक्षेसाठी तात्पुरत्या जामीनावर बाहेर आला होता.

Sangli youth murder case two arrest
रोहन नाईक हत्या प्रकरण दोन अटक

By

Published : Mar 24, 2022, 1:51 PM IST

Updated : Mar 24, 2022, 2:18 PM IST

सांगली - सांगली शहरात किरकोळ वादातून तरुणाचा खून झाला ( Rohan Naik murder two arrest ) होता. या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बारमध्ये दारू पीत असताना दोन गटात झालेल्या वादातून रोहन नाईक या 21 वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. सांगली शहरातल्या एसटी स्टँड रोडवर मंगळवारी रोहन नाईक (वय 21) या तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घूण खून करण्यात आला होता.

घटनास्थळाचे दृश्य

हेही वाचा -Sangli : चांदोली धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

किरकोळ वादातून खून -रोहन हा बारमध्ये दारू पीत असताना त्या ठिकाणीच दारू पिणाऱ्या काही तरुणांबरोबर किरकोळ वाद झाला. या वादानंतर बारमधून बाहेर पडलेल्या रोहन नाईक याचा पाठलाग करून सहा ते सात जणांनी त्याचा धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेनंतर सांगली शहरात खळबळ उडाली होती. सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

मुख्य संशयित परीक्षेसाठी तात्पुरत्या जामीनावर आला होता बाहेर

या खून प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी गतीने तपास करत चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामधील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये साहेबराव किरमल खैरावकर आणि श्रेयस अश्विन शहा या संशयितांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित राज पाटील हा अद्याप फरार आहे. राज हा एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. नुकतेच बारावी परीक्षेसाठी त्याला तात्पुरता जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा -World Sparrow Day 2022 : 'असा'ही चिमणी दिन, लहानग्यांसोबत पालकांच्या पार पडल्या घरटी बांधणी स्पर्धा

Last Updated : Mar 24, 2022, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details