महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक; सांगलीत आणखी आढळले दोन रुग्ण, कोल्हापूरच्या नातेवाईकालाही झाली लागण

इस्लामपूरमधील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एकाच कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाली. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

By

Published : Mar 27, 2020, 7:35 AM IST

Updated : Mar 27, 2020, 8:24 AM IST

sng
शासकीय रुग्णालय मिरज

सांगली- इस्लामपूरमधील आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर "त्या" चार कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापूरच्या वडगावमधीलही एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. आता सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा हा 11 वर पोहोचला आहे.

शासकीय रुग्णालय मिरज
इस्लामपूर येथील 4 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना व संपर्कात आलेल्या बारा जणांना मिरजेतील रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पाच जणांना लागण झाली होती. तर उर्वरित व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. एकूण बारा जणांचे नमुने हे सांगली आरोग्य विभागाकडून पाठवण्यात आले होते. त्यापैकी अकरा जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यामधील इस्लामपूरमधील दोन जणांना तर कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथील एकाला कोरोना झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे. या सर्व जण महिला आहेत. बाधितांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत .सांगलीच्या इस्लामपूर येथील चौघांना सुरुवातीला सौदी अरेबियातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती.आणि त्यांच्या घरातील नातेवाईकांना आणि जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
Last Updated : Mar 27, 2020, 8:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details