महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2022, 9:21 PM IST

ETV Bharat / state

Diwakar Raote On Eknath Shinde : जे गेलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करून लढाईला तयार राहा - दिवाकर रावते

माजी मंत्री दिवाकर रावते ( Diwakar Raote ) यांनी मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) समर्थकांना फटकारले आहे. जे बंडखोर गेले ते सेनेचे कधी नव्हते, भाजप ( BJP ) बंडखोराना आमदारांना ( Shiv Sena Rebel MLA ) जवळ करून सेना संपवण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Diwakar Rawate
दिवाकर रावते

सांगली - जे गेले त्यांना श्रद्धांजली! अश्या शब्दात शिवसेना नेते, माजी मंत्री दिवाकर रावते ( Diwakar Raote ) यांनी मुख्यमंत्री शिंदे समर्थकांना ( Chief Minister Shinde ) फटकारले आहे. तसेच जे बंडखोर गेले ते सेनेचे कधी नव्हते, भाजप ( BJP ) बंडखोराना जवळ करून सेना संपवण्याचे काम करीत आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. ती कधीही संपणार नाही. जे गेलेत त्यांना आगामी निवडणुकीत ( Upcoming elections ) संपवायचं आहे. असा एल्गार ही रावते यांनी यावेळी केला आहे. ते सांगलीत शिवसैनिकांच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.

सांगलीत शिवसैनिकांची बैठकी

शिवसेनेचे एकनिष्ठपणे काम करावे -शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हा निहाय शिवसैनिकांच्या बैठका घेण्यात येत आहेत. सांगलीमध्ये ही शिवसेनेचे नेते व माजी मंत्री दिवाकर रावते, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा प्रमुखांसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना रावते म्हणाले की, शिवसेना कार्यकर्त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता शिवसेनेचे एकनिष्ठपणे काम करावे.

हेही वाचा -CM Eknath Shinde On Maha Tour : ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदे देणार टक्कर; लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर

गेलेल्याना श्रद्धांजली -उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या पाठीशी उभे राहावे, त्यावेळी तुम्हाला केलेल्या कामाच्या स्वरूपात नक्कीच तुम्हाला कोणते ना कोणते तरी पद मिळेल. शिवसेनेची नोंदणी आजची नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत की,आम्ही उद्धव साहेब यांच्या पाठीशी आहोत असे रावते म्हणाले. गेलेली माणसे परत येत नाही. त्यामुळे त्यांचा शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा किंवा ते परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहून आपले काम गतीने सुरू करू. पूर्वी पेक्षा जास्त ताकतीने पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचे त्यांनी आता पासून कामाला लागा. शिवसेनेकडूनच शिवसेना पाडायची हा डाव आहे. त्यांना पाहिजे ते घडवून आणण्याचे काम करीत आहेत. आता जास्तीत जास्त सभासद करा .या लढाईत आपल्याला शिवसैनिक म्हणून काम करायचे आहे. वर काय चालले या पेक्षा आपल्या जिल्ह्यात सामान्य पर्यत जाऊन विचार सांगा. जे बाहेर गेले त्यांची जिवंतपणी आत्महत्या झाली आहे,असे वाटायला पाहिजे. एकी करा पक्ष बळकट करा,असे आवाहन ही रावते यांनी यावेळी केले.

हेही वाचा -Sanjay Raut on EC : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोग प्रश्न उपस्थित करते हे धक्कादायक - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details