महाराष्ट्र

maharashtra

शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

By

Published : Jan 11, 2020, 9:57 AM IST

Published : Jan 11, 2020, 9:57 AM IST

farmers association agitation
शेतकरी संघटनेचे आंदोलन, यवतमाळ

सांगली - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकरी संघटनेने सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशांची होळी करत निषेध नोंदवला.

शेतकरी संघटनेने केली शासन अध्यादेशाची होळी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मतांचा अधिकार राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसेच सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शिवथाळी योजनेला ही शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा -'दाभोलकर-पानसरे यांच्या खुनात ऋषीकेश देवडीकरचा सहभाग तपासावा'

शेतीमालाच्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या शिवथाळीतील शेतीमालाला सरकारकडून कवडीमोल भाव देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने शेतीमालाला आधी हमीभाव द्यावा, तसेच बाजार समितीमध्ये असलेला शेतकऱ्यांना मतांचा अधिकार पुन्हा द्यावा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details