महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षकांकडून 1 लाख 70 हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी व अधीक्षकाला अटक

सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे या दोघांना एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

शिक्षणाधिकारी व अधीक्षकाला अटक
शिक्षणाधिकारी व अधीक्षकाला अटक

By

Published : May 7, 2022, 4:08 PM IST

सांगली - शिक्षकांकडून लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी व अधीक्षकाला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 1 लाख 70 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील विष्णू कांबळे यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली.

सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे या दोघांना एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. तीन शिक्षक तक्रारदारांकड़ून त्यांच्या पदवीधर वेतनश्रेणी प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी प्रत्येकी 60 हजार असे 1 लाख 80 रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एक लाख 70 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे या दोघांना पकडण्यात आले. त्या दोघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details