महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 11, 2019, 2:50 PM IST

ETV Bharat / state

भय इथले संपत नाही ! सांगलीमध्ये 2005 च्या महापुरासारखी सध्याची स्थिती

गेल्या 48 तासांमध्ये जवळपास साडेतीन फुटांनी पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे शहरातील पाणी ओसरू लागले. काही भागाची महापुराच्या विळख्यातून सुटका झाली आहे.

सांगलीमध्ये 2005 च्या महापूरासारखी सध्याची स्थिती

सांगली- महापुर आता ओसरू लागला आहे. मात्र, सध्या अजूनही कृष्णाकाठ महापुराच्या मगरमिठीत आहे. 2005 च्या महापुरात जी अंतिम स्थिती होती. तीच परस्थिती सांगलीमध्ये आहे. त्यामुळे कृष्णाकाठचे भय अजून संपल नसल्याचे दिसून येत आहे.

सांगलीमध्ये 2005 च्या महापूरासारखी सध्याची स्थिती

गेल्या 48 तासांमध्ये जवळपास साडेतीन फुटांनी पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे शहरातील पाणी ओसरू लागले. काही भागाची महापुराच्या विळख्यातून सुटका झाली आहे. तर अनेक घरे आणि रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, कृष्णेच्या काठी अनेक गावांमध्ये आणि सांगली शहराच्या आसपास हजारो नागरिक अद्याप अडकून आहेत. त्यामुळे नागरिकांना बाहेर काढण्याचे काम व त्यांना मदत पुन्हा युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

सैनिक, नौदल, एनडीआरएफ त्याचबरोबर राज्य आपत्ती निवारण पथकाची अतिरिक्त कुमक सांगलीमध्ये दाखल झाली आहे. नागरिकांना पूराच्या विळख्यातून वेगाने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, सांगलीची सध्याची परिस्थिती अजूनही भीषण आहे. 2005 मध्ये जो महापूर आला होता. त्यामध्ये जो भाग या पुरामध्ये बाधित झाला होता. आता तिथेपर्यंत पाणी ओसरले आहे आणि हळूहळू पाणी ओसरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details