महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबरच रमाई घरकुल योजनेचीही सबसिडी देण्याचा विचार'

मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबर रमाई घरकुल योजनेची सबसिडी जोडून देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

By

Published : Jun 30, 2019, 1:16 PM IST

सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

सांगली - मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबर रमाई घरकुल योजनेची सबसिडी जोडून देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. सांगलीच्या मिरजेत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गतील 'भीमपलास' योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.

मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबरच रमाई घरकुल योजनेचीही सबसिडी देण्याचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, प्रत्येक गरीब कुटुंबाला घर, या संकल्पनेतून पंतप्रधान घरकुल आवास योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 'भीमपलास योजनेचा शुभारंभ शनिवारी मिरजेत झाला.
सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते या योजनेतून निर्माण होणाऱ्या इमारतींचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह विकासक आणि नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या निकषांप्रमाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाला अल्प दरात फ्लॅट व अडीच लाखांची सबसिडी मिळणार आहे. सांगली-मिरज रोडवरील समतानगर येथे हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे.

भूमिपूजनप्रसंगी बोलताना सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे म्हणाले, आज पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी योजनेंतर्गत घरकुल देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास अडीच लाखांची सबसिडी देण्यात येत आहे. तर गरीब मागासवर्गीय कुटुंबासाठी रमाई घरकुल योजनेतूनही राज्यसरकारकडून सबसिडी देण्यात येते, त्यामुळे या दोन्ही सबसिडी जोडल्यास पाच लाखांची सबसिडी मिळेल आणि त्या कुटुंबाला अधिक चांगले होईल, त्यामुळे याबाबत आपण दोन्ही सबसिडी जोडून देण्याबाबत विचाराधीन असून, हे शक्य असल्याची माहिती सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details