सांगली- जत तालुक्यातील उमराणी येथील ईश्वरी वसंत खोत (वय 2 वर्षे) या चिमुकलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता घडली.
शेततळ्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू, जत तालुक्यामधील उमराणीतील घटना
आई चिमुकलीसाठी दूध आणायला घरात गेली. अंगणात खेळणारी चिमुकली खेळता-खेळता शेततळ्यात पडली. यात तिचा मृत्यू झाला आहे.
उमराणीतील वसंत खोत यांची ईश्वरी ही एकुलती एक मुलगी होती. घरात आई शीतल आणि मुलगी ईश्वरी दोघीच होत्या. ईश्वरी अंगणात खेळत होती. तिच्यासाठी दूध आणायला शितल घरात गेली. शीतल घरातून दूध घेऊन अंगणात आली असता ईश्वरी दिसेनाशी झाली. त्यावेळी त्यांनी ईश्वरीचा शोधू सुरू केला असता, ती शेत तळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. शीतल ईश्वरला वाचण्यासाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी शीतलचा चुलत भाऊ मुऱ्याप्पा पुजारी तिथे आला. ईश्वरीला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरला परंतु ईश्वरीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - राज्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देणार - जलसंपदा मंत्री