महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेता वैभव मांगले नाटक सुरू असताना चक्कर आल्याने स्टेजवर कोसळले

वैभव मांगले नाटक सुरू असताना रंगमंचावर कोसळले...अशक्तपणामुळे आली होती चक्कर...उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

By

Published : Apr 26, 2019, 11:15 PM IST

Updated : Apr 26, 2019, 11:31 PM IST

वैभव मांगले


सांगली - मराठी अभिनेता वैभव मांगले आज नाटकाचे शो दरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळले आहेत. सांगलीच्या भावे नाट्यगृहात अलबत्या गलबत्या नाटकाचा शो सुरू असताना ही घटना घडली आहे. घटनेनंतर मांगले यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

अभिनेता वैभव मांगले

अभिनेते वैभव मांगले यांचा आज सांगली मध्ये आलबत्या-खलबत्त्या या नाटकाचा शो होता. विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता नाटकाचा शो सुरू झाला आणि काही वेळात नाटक सुरू असताना स्टेजवरच वैभव मांगले यांना अचानक चक्कर आली मांगले हे स्टेजवर कोसळले.यानंतर नाटकाचे संयोजकांची एकच धावपळ उडाली.

यानंतर नाटकाचा शो रद्द करत तातडीने मांगले यांना सांगलीच्या क्रांती कार्डीअक या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशक्तपणामुळे मांगले यांना चक्कर आल्याचे डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आले.असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Last Updated : Apr 26, 2019, 11:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details