सांगली - गोपीचंद पडळकर यांची विधानपरिषदेवर आमदारपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक गावात घरोघरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पडळकरवाडी येथेही गोपीचंद पडळकर यांच्या आईनेही घरावर गुढी उभारत आनंद व्यक्त केला.
गोपीचंद पडळकर बिनविरोध आमदार, आटपाडी येथे गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा - आटपाडी आनंदोत्सव न्युज
गेल्या २५ वर्षात आटपाडी तालुक्याला आमदारकीची संधी मिळाली नव्हती. मात्र, गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर होती. ९ जागांसाठी ९ उमेदवार असल्याने पडळकर यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. पडळकर यांच्या रुपाने तालुक्याला आमदार मिळाला.

गेल्या २५ वर्षात आटपाडी तालुक्याला आमदारकीची संधी मिळाली नव्हती. मात्र, गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर होती. ९ जागांसाठी ९ उमेदवार असल्याने पडळकर यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. पडळकर यांच्या रुपाने तालुक्याला आमदार मिळाला. त्यामुळे भाजप आणि पडळकर समर्थकांनी आटपाडी तालुक्यात लॉकडाऊनमध्येही उत्सव साजरा केला.
रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रविण दटके आणि रमेश कराड या तिघांचीही विधानपरिषदेवर भाजप आमदार म्हणून वर्णी लागली आहे. सुरुवातीला डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज देखील दाखल केला होता. रमेश कराड यांनी देखील डमी अर्ज सादर केला होता. मात्र, गोपछडे यांनी अर्ज माघारी घेतला आणि रमेश कराड हेच भाजपचे आमदार झाले.