सांगली- पूर्व आफ्रिकेतून आलेला एका व्यक्तीचा सांगलीच्या मिरजेत मृत्यू झाला आहे. मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, त्या रुग्णांचा ओमायक्रॉन ( Omicron Variant ) चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याने भीती व्यक्त केली जात आहे. पण, जिल्हा प्रशासनकडून त्या व्यक्तीचा निमोनियामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आफ्रिका टू सांगली ...
मात्र, खबरदारी म्हणून मृत व्यक्तीच्या घरातील 5 आणि संपर्कातील 20 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्या व्यक्तीने पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून केनिया-दोहा-मुंबई, असा प्रवास करत जत या ठिकाणी आला होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने एका खासगी रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांनंतर प्रकृती अतिगंभीर बनल्याने त्या व्यक्तीला बुधवारी (दि. 8 ) मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी शासकीय रुग्णालयात त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.