महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण; अंधश्रद्धा निर्मूलन विभागाचा उपक्रम

5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन ११ वाजेपर्यंत चालला. सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रध्दा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

By

Published : Dec 26, 2019, 1:46 PM IST

sangli
सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण

सांगली -सूर्यग्रहण पाहण्यासाठी शहरात 'सुर्योत्सव' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यग्रहण पाहण्याचा आंनद लुटला. माध्यमिक शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन ११ वाजेपर्यंत चालला.

सांगलीत 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुभवले सूर्यग्रहण

सूर्यग्रहणाबद्दल समाजात असणाऱ्या अंधश्रध्दा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण तयार व्हावा, सूर्यग्रहणासंबंधी गैरसमज दूर व्हावेत आणि सूर्यमालेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, सोलर चष्म्याच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. तसेच, सूर्यग्रहण पाहताना जेवण करून आणि पाणी पिऊन अंधश्रद्धांना मोडीत काढण्यासाठी पाऊलही उचलले.

हेही वाचा -तामिळनाडूमध्ये मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज, जुन्या काळात केला जायचा वापर

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी उपस्थितीती लावली होती. सूर्यग्रहण पाहण्याचा वेगळा अनुभव मिळाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details