रत्नागिरी (दापोली) -ऐन दिवाळीच्या दिवशी दापोली तालुक्यातील हर्णे पाळंदे येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत दोघेही महाडमधील रहिवासी आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाड येथील 8 जण आले होते फिरायला
दिवाळीनिमीत्त सध्या सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेकांची पावलं कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळू लागली आहेत. दरम्यान आज सकाळी महाड येथील नवानगर सुतार आळी येथून ८ पर्यटक हर्णे पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. आज अमावस्या असल्यामुळे समुद्राला भरती आली होती.
पोहायला उतरलेले सहा जण बुडाले
आठ जणांपैकी दोघेजण किनाऱ्यावर थांबले आणि उर्वरित सहा जण पोहायला गेले. पाळंदे समुद्र किनारा तसा धोकादायक नाही. परंतु समोरच एक खड्डा होता. त्या खड्डयात हे सहाजण पोहत होते. त्याचवेळी जोराची लाट आली आणि सहाही जण या लाटेत बुडाले. हे तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. आरोडाओरड ऐकून तेथील काही स्थानिक तरुण त्यांना वाचवण्यासाठी समुद्रात उतरले. बुडणाऱ्या सहा जणांपैकी चौघांना वाचवण्यात यश आले. तर दोघांचा बुडून मृत्यू झाला.
हर्णे पाळंदेच्या समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू दोघांचा बुडून मृत्यू
चार जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले, मात्र दोघांचा बुडून मृत्यू झाला. एका पर्यटकाचा मृतदेह लगेच सापडला. मात्र दुसऱ्या पर्यटकाचा शोध घेण्यात येत होता. अखेर संध्याकाळच्या सुमारास या पर्यटकाचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा -वाराणसी : धार्मिक सलोखा जपत मुस्लीम महिलेने केली प्रभू श्रीरामांची आरती
हेही वाचा -नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ऊर्जा मंत्र्यांची 'दिवाळी भेट'