महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत गणेशोत्सवावर शोककळा; गणेशमूर्ती विसर्जनावेळी दोघेजण बुडाले, शोधकार्य सुरू

गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना एका मोठ्या लाटेने एकूण चौघांना पाडले, त्यातील दोघेजण पोहत किनारी आले. मात्र वैभव देवळे आणि अनिकेत हळये यांना पोहता येत नसल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले, आणि बेपत्ता झाले.

ganeshotsav
घटनास्थळी जमलेले नागरिक

By

Published : Aug 27, 2020, 10:55 PM IST

रत्नागिरी - गणेशमूर्ती विसर्जनावेळी दोघेजण बुडाल्याची दुर्दैवी घटना आज गुहागरमध्ये घडली आहे. बोऱ्या जेटी येथे संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. हे दोघेही बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. वैभव वसंत देवळे (32) आणि अनिकेत हरेश हळये (20) अशी या दोघांची नावं असून हे दोघेही अडूर गावातील भाटलेवाडी येथील आहेत.


जिल्ह्यात आज भक्तिमय वातावरणात गौरी-गणपतींना निरोप देण्यात येत होता. मात्र गुहागरमध्ये या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले. गुहागर तालुक्यातील बोऱ्या जेटी येथेही आज संध्याकाळी गणपती विसर्जन सुरू होतं.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना एका मोठ्या लाटेने एकूण चौघांना पाडले, त्यातील दोघेजण पोहत किनारी आले. मात्र वैभव देवळे आणि अनिकेत हळये यांना पोहता येत नसल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले, आणि बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. मात्र या दुर्घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details