महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चीनच्या 'त्या' दोन बोटींवर संशयास्पद असं काहीच नाही- पोलिसांचं स्पष्टीकरण

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ समुद्रात चीन मधील दोन संशयित बोटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. दाभोळ पोलिस, कोस्ट गार्ड, कस्टम यांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून या बोटीवरील खलाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते

संशयास्पद आढळून आलेली बोट

By

Published : Jun 9, 2019, 5:38 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ समुद्रात चीन मधील दोन संशयित बोटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. दाभोळ पोलीस, कोस्ट गार्ड, कस्टम यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून या बोटीवरील खलाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.. मात्र या बोटींवर संशयास्पद असं काहीच आढळून आलं नसल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

घटनेचे स्पष्टीकरण देतांना पोलीस
दाभोळ भारतीय शिपयार्ड येथे दुरुस्ती करिता या बोटी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बोटींच्या कागदपत्राबाबत यूनिक मरीन शिपिंग एजन्सी, रत्नागिरी यांना काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी वेळीच कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. या बोटीवर काहीही संशयस्पद आढळले नाही. या बोटी फिशिंगच्या असून, एका बोटीवर 21 आणि दुसऱ्या बोटीवर 17 माणसं आहेत. असे असले तरी आम्ही अजूनही चौकशी करत असल्याचे डीवायएसपी सुरेश पाटिल यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details