रत्नागिरी:दापोली वनौशी येथील सत्यवती पाटणे , पार्वती पाटणे , रुक्मिणी उर्फ इंदूबाई पाटणे या तीन वयोवृद्ध महिलांची 13 जानेवारी रोजी निर्घुण हत्या झाल्याचे उघड झाले. खून झालेल्या सत्यवती पाटणे या गावातील गरजू लोकांना पैसे देत असत असेच पैसे संशयित रामचंद्र शिंदे यानेही घेतले होते व ते त्याने परत दिले नव्हते , तो आर्थिक संकटात होता.
Murder For Money : दापोलीतील त्या तीन वृद्ध महिलांचा खून पैशासाठीच, आरोपी गजाआड
दापोलीतील तिहेरी हत्याकांडातील ( murder of three old women in Dapoli) गुन्हेगाराचा छडा लागला असून वणौशी खोत वाडीतील रामचंद्र वामन शिंदे (53) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पैशाच्या वादातुन हे तिहेरी हत्याकांड (This triple murder over money dispute) झाले तसेच, आरोपी कर्जबाजारी झाला आणि आर्थिक अडचणीत आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
१३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान त्याने या तीन वृद्ध महिलांचा खून केला व त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरातील पैसे लांबविले.
दुसऱ्या दिवशी हि घटना उघड झाल्यावर त्यांने गावातील लोकांना या तीनही महिलांचा मृत्यू जळून झाल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्रकारांची पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शिंदे नातू या गावचे रहिवासी असून ते मुंबई येथे राहत होते. पोलिसांनी रामचंद्र शिंदे यांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता त्याने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गर्ग यांनी दिली.