महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार आज तिवरे धरण दुर्घटनास्थळी देणार भेट - ratnagiri

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज तिवरे धरण दुर्घटनास्थळी देणार भेट देणार आहेत. तसेच या दुर्घटनेत  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांची भेट घेणार आहेत.

शरद पवार

By

Published : Jul 8, 2019, 8:41 AM IST

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज तिवरे धरण दुर्घटनास्थळास भेट देणार आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.

तिवरे धरण दुर्घटनेत एकूण २२ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी १९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून ३ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर या ठिकाणी राजकीय नेत्यांची रीघ लागलेली पाहायला मिळत आहे.

शरद पवार आज तिवरे धरण दुर्घटनास्थळी देणार भेट
या घटनेचे सध्या राजकारण सुरू आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यावरून केलेल्या विधानाबाबत त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधकही या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुर्घटनास्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे पवार आता या दुर्घटनेबाबत नेमके काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details