रत्नागिरी- पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कुंभार्ली घाट हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या घाटातून वाहनांची २४ तास रहदारी असते. परंतू या घाटातील रस्त्याच्या मध्यभागी अनेक खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. रस्त्याची अवस्था अत्यंक बिकट झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकावर अपघाताची टांगती तलवार आहे. वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली घाटातील रस्ता धोकादायक
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कुंभार्ली घाट हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या घाटातून वाहनांची २४ तास रहदारी असते. परंतू या घाटातील रस्त्याच्या मध्यभागी अनेक खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकावर अपघाताची टांगती तलवार आहे.
कुंभार्ली घाटातील चिपळूण-कराड महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने हा अपघात होत आहेत. अवकाळी पावसामुळे घाटातील रस्त्यावर धुके पसरते. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात या घाटात होत आहेत. या घाटातील रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची रहदारी असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे आहे, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
कुंभार्ली घाटातील रस्त्यांची अवस्था ही अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आह. तसेच कुंभार्ली घाटातील रस्त्यावर खड्डे आहेतच. परंतु रस्त्याच्या साईटला असणारे संरक्षण कठडे नाहीसे झाले आहेत. लोखंडी बॅरिकेट्स तुटलेले दिसत आहेत. या घाटातून प्रवास करणे अवघड झाले आहे. घाटातील सूचना फलकावर गंज चढला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवतांना अनेक वेळा अपघात झाले आहेत. संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. कुंभार्ली घाटामध्ये अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे व वाहनचालकांचे हाल होत आहेत. कुंभार्ली घाटातील रस्त्यांची अवस्था फाटक्या जाळीसारखी झाली आहे.