महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात एकूण ६१२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. रविवारी आणखी 42 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 612 वर पोहचली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी

By

Published : Jul 12, 2020, 9:54 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात रविवारी 612 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 31 वर पोहचली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 865 वर पोहचला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. रविवारी आणखी 42 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 612 वर पोहचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे जिल्‍ह्याचे प्रमाण आता 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. दरम्यान आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये दापोली येथील 12, घरडा येथील 14, रत्नागिरीतील 11 आणि समाज कल्याण येथील 5 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा -पावनखिंडीतला थरार जिवंत करणाऱ्या 'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच

जिल्ह्यात रविवारी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा संख्या 865 वर पोहचली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार चिपळूण येथील एका 72 वर्षीय रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 31 झाली आहे.

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन -

जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

11 हजार पेक्षा जास्त चाचण्या निगेटिव्ह -

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 12 हजार 436 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 878 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 864 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 11 हजार 02 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 558 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 558 नमुन्यांचे अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

हेही वाचा -राज्याभिषेकाच्या जलाने पावन झालेला 'हत्ती तलाव' दीडशे वर्षांमध्ये पहिल्यांदाच भरला..

ABOUT THE AUTHOR

...view details