रत्नागिरी - मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने अखेर गुरूवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. रत्नागिरीतही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून हा जल्लोष करण्यात आला.
मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होताच रत्नागिरीतही जल्लोष
मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर रत्नागिरीतही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून ह्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी गेली 25 वर्ष मराठा समाज लढा देत होता. आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. या लढ्यात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले. या अरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर आज या लढ्याला यश आले. 16 टक्के आरक्षण देणं शक्य नसल्याचे म्हणत न्यायालयाने मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देणं शक्य असल्याचे मत नोंदवले आहे. मराठा समाजाला यापुढे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध असणार आहे. त्यामुळेच मराठा समाजाकडून राज्यभर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे.
रत्नागिरीतल्या मारुती मंदिर परिसरातही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत, घोषणा देत, फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.