महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2020, 4:43 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरीमध्ये रेशन दुकानात काळाबाजार... दुकानदारावर गुन्हा दाखल

रणधीर शिंदे हे या रेशन दुकानावर रेशन खरेदीसाठी गेले. त्यांच्या रेशन कार्डवर सहा व्यक्तींची नोंद आहे. प्रत्यक्षात 6 व्यक्तींच्या नावावर धान्य देण्याऐवजी केवळ दोन व्यक्तींचेच धान्य त्यांना देण्यात आले. मात्र, शिंदे यांना केवळ 6 किलो गहु आणि 4 किलो तांदूळ देण्यात आले. आ‌ॅक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत हा सारा प्रकार सुरू होता.

police-file-case-on-ration-shop-in-ratnagiri
police-file-case-on-ration-shop-in-ratnagiri

रत्नागिरी- कोरोना विरोधात लढण्यासाठी सारा देश लाॅकडाऊन आहे. त्यामुळे सरकारकडून गरिबांना रेशन दुकानात अल्प दरात धान्य देण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी गरिबांच्या धान्यावर रेशन दुकानदार डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. असाच धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव इथल्या रेशन दुकानात झालेला असून या रेशन दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीमध्ये रेशन दुकानात काळाबाजार...

हेही वाचा-नशेसाठी संचारबंदीचे उल्लंघन पडले महागात, गावकऱ्यांनी दिला चोप

रणधीर शिंदे हे या रेशन दुकानावर रेशन खरेदीसाठी गेले. त्यांच्या रेशन कार्डवर सहा व्यक्तींची नोंद आहे. प्रत्यक्षात 6 व्यक्तींच्या नावावर धान्य देण्याऐवजी केवळ दोन व्यक्तींचेच धान्य त्यांना देण्यात आले. मात्र, शिंदे यांना केवळ 6 किलो गहु आणि 4 किलो तांदूळ देण्यात आले. आ‌ॅक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात प्रतिव्यक्ती धान्य देण्याच्या योजनेतून धान्य मिळाले नाही म्हणून शिंदे यांनी तक्रार केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत रेशन दुकानदार मधुकर माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिवानावश्यक वस्तू कायद्या प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details