महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Persinnet Fishermen Morcha : पर्ससीननेट मच्छिमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; आत्मदहनाचा दिला इशारा

पर्ससीननेट मच्छिमार मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पुरक व्यावसायिक या विराट मोर्चात सहभागी झाले होते. मिरकरवाडा जेटी येथून सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये हजारो मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यलय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभा घेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

मच्छिमारांचा मोर्चो
मच्छिमारांचा मोर्चा

By

Published : Mar 31, 2022, 4:50 PM IST

Updated : Mar 31, 2022, 5:01 PM IST

रत्नागिरी -गेल्या तीन महिन्यापासून उपोषणाला बसलेल्या पर्ससीननेटधारक मच्छिमारांचा आज (गुरुवारी) मोर्च्याच्या रूपाने उद्रेक झाला. नवीन मासेमारी कायद्यातील जाचक अटींमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. शासनाने या अटी रद्द कराव्यात आणि केवळ पर्ससीन मच्छिमारांना लक्ष करून कारवाई करू नये, इतर मासेमारीचाही अभ्यास करावा, या मागणीसाठी गुरुवारी मिरकरवाडा जेटी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला.

प्रतिक्रिया जाणून घेताना प्रतिनिधी

समुद्रातील मत्स्य साठ्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्ससीननेट मासेमारीलाच जबाबदार धरून या मासेमारीवर जाचक निर्बंध टाकण्यात आले. इतर मासेमारी जाळ्यांनी होणाऱ्या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणाऱ्या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे. या मागणीसाठी पर्ससीननेट मच्छिमार मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पुरक व्यावसायिक या विराट मोर्चात सहभागी झाले होते. मिरकरवाडा जेटी येथून सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये हजारो मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यलय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभा घेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

'...तर आत्मदहन करु' :मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छिमार सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही यामध्ये लक्षणीय होता. आम्हाला आकारला जात असलेला दंड केवळ चारच महिने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छिमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत मंत्रालयावर धडकू, असा थेट इशारा मच्छिमारांनी दिला आहे. तरीही दखल घेण्यात आली तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मच्छीमार नेते नासीर वाघू यांनी दिला आहे.

हेही वाचा -Minister Bhujbal Helped Accident Victims : मंत्री भुजबळांनी केली अपघातग्रस्तांची मदत, ताफ्यातील गाडीतून पोहचविले रुग्णालयात

Last Updated : Mar 31, 2022, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details