रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची अधिक आवश्यक भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यात येणार आहेत. पाली, रायपाटण, संगमेश्वर लांजा, मंडणगड या ग्रामीण रुग्णालयात नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यात येणार आहे. महिनाभरात प्रत्यक्षात सर्व युनिट सुरु होतील अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषेदत दिली.
सद्या महिला रुग्णालयात ऑक्सिजन युनिटचे काम सुरु आहे. तर जिल्हा शासकिय रुग्णालयातील ऑक्सिजन युनिट सुरु झाले आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेची भिती अधिक असल्याने पुर्व तयारी म्हणून जिल्हा नियोजनमधून ऑक्सिजनची पाच युनिट पाली, रायपाटण, संगमेश्वर लांजा, मंडणगड या ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात येणार आहेत. परदेशातून ही युनिट मागविण्यात आली आहे. जलवाहतुकीद्वारे लवकरच यंत्र सामुग्री पोहचेल. त्यानंतर महिनाभरात ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होणार असल्याचे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.