महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे मार्लेश्वर यात्रोत्सव रद्द, केवळ धार्मिक विधी होणार

महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. यावर्षी यात्रोत्सव होणार नसून केवळ धार्मिक विधी मानकरी आणि निवडक लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती मार्लेश्वर देवस्थानचे ट्रस्टींनी दिली आहे.

Ratnagiri Marleshwar news
रत्नागिरी मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्स

By

Published : Jan 3, 2021, 3:14 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. यावर्षी यात्रोत्सव होणार नसून केवळ धार्मिक विधी मानकरी आणि निवडक लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती मार्लेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सुनील लिंगायत, गिरिजा देवीचे मानकरी बापू शेट्ये, काका शेट्ये, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
500 वर्षांच्या इतिहासात प्रथमच यात्रोत्सव रद्द

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर देवस्थान यात्रोत्सव सोहळा 500 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रद्द करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार फक्त मानकरीच विवाह सोहळ्यात सहभागी होऊन साजरा करतील. हा विवाह सोहळा साखरपा येथील श्री देवी गिरीजीमाते बरोबर 14 जानेवारी 2021रोजी होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा यात्रोत्सव यावर्षी मर्यादित स्वरूपात फक्त सर्व मानकरी कुटुंबीय यांच्या उपस्थितीत करण्यात येईल.
भाविकांना आवाहन
दरम्यान, भाविकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री मार्लेश्वरला नमस्कार करा व आपले सांगणे सांगावे तो आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असे आवाहन सर्व मानकरी मंडळींनी केले आहे. दरम्यान जादा एसटी फेऱ्या किंवा अन्य खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. 13 ते 15 जानेवारी या कालावधीत मार्लेश्वरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याची दखल घेऊन भाविकांनी मार्लेश्वरला येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- DCGI कडून कोविशिल्ड आणि कॉव्हॅक्सिन लसींना मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details