रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांनी आज कात टाकली. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एकस्प्रेस या २ रेल्वे गाड्यांचे आता रंगरुप पालटले आहे. या दोन्ही गाड्या यापूर्वी निळ्या रंगात दिसत होत्या. मात्र, आता नव्या रुपात म्हणजेच लाल करड्या अशा आकर्षक रंगात कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या आजपासून धावणार आहेत.
मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस गाड्यांना नवी झळाळी; 'ही' आहेत वैशिष्ट्ये
स्वतःच्या मालकीच्या कोकण रेल्वेच्या या अलिशान आणि आत्याधुनिक कोच असलेल्या गाड्यांना एलएचबी कोच जोडले गेलेत. लाल आणि करड्या रंगाच्या या एलएचबी कोचसाठी जर्मनीच्या तंत्रज्ञानाची जोड घेण्यात आलीय. या नव्या रुपातल्या या गाड्यांमधील एका डब्यात आता ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतात. या नव्या डब्यांच्या रचनेमुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील मधील १२४ तर मांडवी एक्स्प्रेसमधील ९४ ने प्रत्येक फेरीमागे स्लीपर आसन क्षमता वाढणार आहे.
स्वतःच्या मालकीच्या कोकण रेल्वेच्या या अलिशान आणि आत्याधुनिक कोच असलेल्या गाड्यांना एलएचबी कोच जोडले गेलेत. लाल आणि करड्या रंगाच्या या एलएचबी कोचसाठी जर्मनीच्या तंत्रज्ञानाची जोड घेण्यात आलीय. या नव्या रुपातल्या या गाड्यांमधील एका डब्यात आता ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकतात. या नव्या डब्यांच्या रचनेमुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील मधील १२४ तर मांडवी एक्स्प्रेसमधील ९४ ने प्रत्येक फेरीमागे स्लीपर आसन क्षमता वाढणार आहे. नियमित निळ्या रंगात कोकणातून धावणारी मांडवी एकस्प्रेस आज वेगळ्या ढंगात पहिल्यांदा गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकात आली. जर्मनीच्या तंत्रज्ञानाची जोड घेवून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या नव्या ढंग आणि रुपातल्या गाड्यांची खासीयत काय आहे ते पाहूया.
- मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पालटले
- लाल करड्या रंगात एलएचबी आत्याधुनिक कोच
- टॉयलेट यंत्रणेत बदल, अग्नीशमन यंत्रणा प्रत्येक डब्यात
- डब्यांच्या रचनेत बदल झाल्यामुळे गाडीचा आवाज १०० डेसीबल ऐवजी ६० डेसीबल
- दरवाज्याची रंदी जास्त असल्याने चढणे उतरणे सोईचे
- डब्यांच्या खिडक्या स्लायडिंगच्या आणि रुंद
ही आत्याधुनिक रेल्वे गाडी कोकण रेल्वेच्या मालकीची आहे. त्यामुळे वेगळ्या रंगाची ही रेल्वेगाडी नक्कीच सर्वांच आकर्षण असेल. दरम्यान कोकण रेल्वेच्या १९९६ पासूनच्या प्रवासात सहभागी असलेले प्राध्यापक उदय बोडस यांनी आज मडगावपासून रत्नागिरीपर्यंतचा प्रवास या नवीन रंगातल्या रेल्वे गाडीतून केला. नवीन रंगाच्या रेल्वेगाडीतला प्रवास कसा होता हे जाणून घेतलंय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.