रत्नागिरी - भराडीदेवीच्या यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही यात्रा आंगणेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे भरते. यात्रेकरिता भाविकांची गर्दी होत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल येथून या विशेष रेल्वे सावंतवाडी, थिवी आणि करमळीकडे सोडल्या जाणार आहेत.
हेही वाचा - मध्य रेल्वेची एसी लोकल ३० जानेवारीपासून सेवेत
एलटीटी-सावंतवाडी ही (क्रमांक-01161/01162) रेल्वेगाडी येत्या 14 फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी दीड वाजता ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणार असून, मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. बावीस डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबणार असल्याची माहित रेल्वे प्रशासनाने दिली.
हेही वाचा -सीएए समर्थनार्थ रामदेव बाबा मैदानात, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर निशाणा