रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावात किंजळकर वाडी येथे एक मादी बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. याची उंची 46 सेमी असून लांबी 155 सेमी आहे. बिबट्याचे वय अंदाजे2 वर्षे आहे.
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू?
कडवई गावात किंजळकर वाडी येथे एक मादी बिबट्या मृतावस्थेत सापडला असून याची उंची 46 सेमी असून लांबी 155 सेमी आहे. क्षाच्या शोधत हा बिबट्या मानवीवस्तीत आल्यावर मृत झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
बिबट्याचा मृत्यू
दरम्यान, भक्षाच्या शोधत हा बिबट्या मानवीवस्तीत आल्यावर मृत झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, वनापाल सुरेश उपरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.