रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील धोपश्वर-बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास मडामंडळाचे वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणती चर्चा होणार ? याकडे आता सार्यांचे लक्ष लागले आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन
राजापूर तालुक्यातील धोपश्वर-बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दिपक नागले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रकाश गुरव, उन्नती वाघरे यांच्यासह धोपेश्वर, गोवळ, शिवणेखुर्द, सोलगाव, नाटे, देवाचेगोठणे, राजवाडी येथील सरपंच, प्रशासक यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
तालुक्यातील धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने अनुकूलता दाखविली आहे. त्यातून रिफायनरी प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. अशामध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी विविध प्रकारचे ड्रोनद्वारे होत असलेल्या सर्व्हेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करीत काही दिवसांपूर्वी आंदोलन छेडले होते. त्यानंतर, लोकप्रतिनिधी, प्रशासन, त्या-त्या गावचे सरपंच आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये होणार्या चर्चेने प्रकल्पाच्या भविष्यातील दिशा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार ? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.