महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 7:27 PM IST

Updated : Oct 20, 2019, 8:17 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरीचे हुतात्मा जवान सुभेदार भालचंद्र झोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले सुभेदार भालचंद्र रामचंद्र झोरे(५३) यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या हरचेरी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार भालचंद्र झोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रत्नागिरी - भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले सुभेदार भालचंद्र रामचंद्र झोरे(५३) यांच्या पार्थिवावर रविवारी त्यांच्या हरचेरी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार भालचंद्र झोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुभेदार झोरे हे अलाहाबाद येथे कर्तव्यावर असताना त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सोमवारी पहाटे 6 वाजता मुंबई मार्गे त्यांच्या मूळ गावी हरचेरी येथे आणण्यात आले. फूलांनी सजविलेल्या रथावर तिरंग्यात गुंडाळलेल्या त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सकाळी 09 वाजता निघाली. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अंत्ययात्रेत उपस्थिती लावली होती. झोरे यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यासाठी होते, अधुनमधून विशेष कामानिमित्ताने त्यांचे गावाला येणेजाणे असायचे.

हेही वाचा -चिपळूणमध्ये पावसामुळे मतपेट्या वाटपाची जागा बदलली

सुभेदार यांच्या पार्थिवावर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, येथील उमेदवार उदय सामंत आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर बंदुकीच्या 21 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली आणि मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार भालचंद्र झोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

Last Updated : Oct 20, 2019, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details