रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. सरत्या वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोहा ते ठोकूर या ७४१ कि.मी.च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम आहे. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होऊन डिझेल इंजिनावरील इंधन खर्चात वार्षिक २० टक्के बचत होण्यास मदत होईल, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोकण रेल्वे २५ वर्षाचा टप्पा पार करणारी दिवसेंदिवस कात टाकत आहे. एकीकडे दुपदरीकरणचे काम वेगात सुरू आहे. तर दुसरीकडे आता विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्युतीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने खऱया अर्थाने आता गती घेतल्याचे दिसून येत आहे.