महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी विद्यार्थ्यांनी फोटोद्वारे एकत्र येत दिला कोरोनामुक्तीचा संदेश

रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातल्या काही माजी विद्यार्थ्यांनी फोटोच्या माध्यमातून एकत्र "कोरोनामुक्त जगण्यासाठी घरात रहा, भविष्याचे प्लॅनिंग करा आणि पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा" असा संदेश दिला आहे.

माजी विद्यार्थ्यांनी फोटोद्वारे एकत्र येत दिला कोरोनामुक्तीचा संदेश
माजी विद्यार्थ्यांनी फोटोद्वारे एकत्र येत दिला कोरोनामुक्तीचा संदेश

By

Published : Apr 28, 2020, 2:59 PM IST

रत्नागिरी - येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातल्या काही माजी विद्यार्थ्यांनी फोटोच्या माध्यमातून कोरोनामुक्तीचा संदेश दिला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी वास्तव्याला असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी फोटो द्वारे एकत्र येत "कोरोनामुक्त जगण्यासाठी घरात रहा, भविष्याचे प्लॅनिंग करा आणि पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा" असा संदेश दिला आहे.

रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून २००० साली कला विभागातून पदवी प्राप्त केलेल्या या विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून यावर्षी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या विद्यार्थ्यांनी येत्या २४ मे रोजी एका स्नेहसंमेलनाचे आयोजनदेखील केले होते. मात्र, देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे हे स्नेहसंमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता कोरोनातून बाहेर पडल्यानंतर हे स्नेहसंमेलन पार पडणार आहे. दरम्यान या माजी विद्यार्थ्यांनी फोटोद्वारे एकत्र येत "कोरोनामुक्त जगण्यासाठी घरात रहा, असा संदेश दिला आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, पुणे येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक समीर भोसले, न्यू इंग्लिश स्कूल जावडे, लांजा-रत्नागिरीचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, साम टीव्हीचे कार्यकारी निर्माता प्रशांत सागवेकर, रत्नागिरी येथील अ‌ॅड. योगिनी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पीआरओ संदीप कांबळे, रत्नागिरीतील व्यावसायिक वैभव‌ पालकर, ठाणे येथील अश्विनी काजळे पेंडसे, विरार येथील मिनल गोखले जोशी, अलिबाग येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या संगिता दामले जोशी, ऐरोली येथील वर्षा संसारे मिरकर या माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details