रत्नागिरी -पाळीव कुत्र्याला खायला घालायला जाताय तर सावधान... कारण रत्नागिरीत कुत्र्याला खायला देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्याने स्वतःचे भक्ष्यकेले. रत्नागिरी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या दुदैवी घटनेत ५५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. दिवाकर पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे. रत्नागिरी शहरातील बाळ मयेकर यांच्या घरात ही घटना घडली. बाळ मयेकर यांच्या घरात त्यांनी पाळलेल्या रॉट व्हिलर जातीच्या कुत्राने हा हल्ला केला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी ही माहिती दिली आहे.
पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; रत्नागिरी शहरातील धक्कादायक घटना
रत्नागिरीमध्ये एका ५५ वर्षीय कामगारावर कुत्र्यावर हल्ला केला. यात कामगाराचा मृत्यू झाला. दिवाकर पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे.
पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; रत्नागिरी शहरातील धक्कादायक घटना
दिवाकर पाटील हे गेल्या काही वर्षापासून बाळ मयेकर यांच्याकडे कामाला होते. आज सकाळी दिवाकर पाटील हे कुत्र्याला खाणे घालण्यासाठी गेले. यावेळी राॅट व्हिलर कुत्र्याने दिवाकर पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला एवढा भयंकर होता की दिवाकर पाटील यांना कुत्र्याने अक्षरशः फाडून काढले. या कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी वनविभागासह प्राणी मित्रांची मदत घेण्यात आली. कुत्र्याला बेशुद्ध करून पाटील यांची सुटका करण्यात आली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. कारण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिवाकर पाटील यांचा मृत्यू झाला होता.
पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी दिली आहे.
हेही वाचा -बिहारमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, ते मुख्यमंत्रिपदावरून बोलणार? निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला